Type and Search from This Blog टाईप करून शोधा

Hsc March 2022 Geography

 सूचना:

(१) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

(२) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख का

 (३) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

(४) नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे

(५) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात.

 (६) नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.


प्र. १. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा.

(अ) 'अ', 'ब' आणि 'क' स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा :


(ब) पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा :

(१) चढत्या वयोरचनेनुसार योग्य क्रम लावा:

(अ) प्रौढ

(ब) चालक

(क) वृद्ध

(ड) युवा


(२) वसाहतीचा आकारानुसार लहानकडून मोठ्याकडे योग्य क्रम लावा ::

(अ) नगर

(च) महानगर

(क) उपनगर

(ड) महाकाय नगर


(३) कमी भांडवल गुंतवणुकीनुसार उदयोगाचे प्रकार योग्य क्रमाने लावा :

(अ) मध्यम

(ब) सूक्ष्म

(क) लघु

(ड) मोठे


(४) पुढील प्रशासकीय प्रदेशाचे कमी क्षेत्रफळाकडून जास्त क्षेत्रफळाकडे योग्य क्रम लावा :

(अ) खेडे

(ब) राज्य

(क) जिल्हा

(ङ) तालुका


(५) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GDP) वाढीसाठी भूमिउपयोजनाचे अनुकूल घटकाकडून प्रतिकूल घटकांकडे योग्य क्रम लावा :

(अ) पडीक भूमी

(ब) चराऊ भूमी

(क) लागवडी खालील भूमी

(ड) वनाखालील भूमी


(क) अचूक सहसंबंध ओळखा व लिहा :


(A: विधान      R : कारण)


1)A : सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.

R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.

(अ) केवळ A बरोबर आहे.

(ब) केवळ R बरोबर आहे..

(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक

स्पष्टीकरण आहे.

(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक

स्पष्टीकरण नाही.


(२) A : लोकसंख्येच्या मनोन्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.

R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे दयोतक आहे.

(अ) केवळ A बरोबर आहे.

(ब) केवळ R बरोबर आहे.

(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक

स्पष्टीकरण आहे..

(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक

स्पष्टीकरण नाही..


३)A: भारत हा कृषिप्रधान देश आहे.

R: भारतात शेतीव्यवसायात जास्त लोक गुंतलेले आहेत.

(अ) केवळ A बरोबर आहे.

(ब) केवळ R बरोबर आहे.

(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक

स्पष्टीकरण आहे.

(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक

स्पष्टीकरण नाही.


4)A : मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे..

R: मुंबईचे स्थान आरबी समुद्रालगत आहे.

(अ) केवळ A बरोबर आहे.

(ब) केवळ R बरोबर आहे.

(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक

स्पष्टीकरण आहे.

(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे

अचूक स्पष्टीकरण नाही..

5) A : प्रदेशाला भौगोलिक स्थान आवश्यक असते.

R: प्रदेशाच्या विकासाला भौगोलिक स्थान  मदत करत नाही.

अ ) केवळ A बरोबर आहे.

ब ) केवळ R बरोबर आहे.

(क) A आणि R. दोन्ही बरोबर आहेत आणि R है A स्पष्टीकरण आहे.

(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे Aचे अचूक स्पष्टीकरण नाही.


(ड) चुकीचा घटक ओळखा व लिहा :

(१) लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम करणारे घटक :

(अ) रोजगार

(ब) शिक्षण

(क) जनगणना

(ड) आरोग्य

(२)प्राथमिक आर्थिक क्रिया

(अ) शेती

(ब) शिकार

(क) मासेमारी

(ड) लघुउद्योग

(३) मुंबई येथील सुती वस्त्रउद्योगास अनुकूल घटक :

(अ) खनिन

(ब) दमट हवामान

(क) बाजारपेठ

(ड) मजूर पुरवठा

(४) आधुनिक संदेशवहनाची साधने :

(अ) भ्रमणध्वनी

(ब) दूरदर्शन

(क) विमान

(ड) ई-मेल

(५) प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक :

(अ) भूरचना

(ब) हवामान

(क) बाजारपेठ

(ड) पाणी पुरवठा

प्र. २. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतीही चार) :

(१) लोकसंख्या वितरण असमान असते.

(२) नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.

(३) कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे.

(४) उद्योगधंदयाचे वितरण असमान असते.

(५) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.

(६) तृतीयक आर्थिक व्यवसायांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात.


प्र. ३. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) :

(१) जन्मदर व मृत्युदर

(२) स्थलांतराचे आकर्षक घटक व अपकर्षक घटक

(३) जलवाहतूक व हवाई वाहतूक

(४) प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल

(५) मळ्याची शेती व विस्तृत शेती


प्र. ४.

(अ) तुम्हांस दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा) :

(१) ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश

(२) तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा

(३) हिंदुस्थान लिव्हर निगम यांचे मुख्यालय

(४) मुंबई बंदर

(५) जगातील सर्वांत जास्त आयुर्मान असणारा देश

(६) दक्षिण अमेरिकेतील पर्वतीय प्रदेश

(७) जगातील सर्वात मोठे वाळवंट

(८) हृर औद्योगिक प्रदेश

ब ) दिलेल्या नकाशा चे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा 



प्रश्न :

(१) कोणत्या गोलार्धात सर्वाधिक औद्योगिक प्रदेश आहेत?

(२) ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणाऱ्या औद्योगिक प्रदेशाचे नाव लिहा.

(३) आशिया खंडातील कोणत्याही दोन औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा.

(४) व्हेनेझुएला औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आहे?

(५) न्यू इंग्लंड औद्योगिक क्षेत्र कोणत्या खंडात आहे?

प्र. ५. खालीलपैकी टिपा लिहा (कोणत्याही तीन) :[१२]

(१) नागरी वस्तीच्या समस्या

(२) सखोल उदरनिर्वाह शेती

(३) संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व

(४) लोकसंख्येची व्यावसायिक संरचना

(५) उद्योगाच्या विकासातील वाहतुकीची भूमिका


प्र. ६. (अ) खालील दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा :(४) [८]

"शेती : एक प्राथमिक व्यवसाय'

   जागतिक स्तरावरील शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे. त्या मानाने आशिया खंडात ते आफ्रिकेपेक्षा कमी आहे. तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेतीक्षेत्र विस्तृत असूनदेखील या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अर्थात विकसित राष्ट्रांत शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे. तर विकसनशील राष्ट्रात या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त आहे.

  शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्याच प्रमाणे शेतीकरण्याच्या विविध पद्धतीही पहावयास मिळतात. शेती या व्यवसायावर भूरचना,मृदा, हवामान, पाणीपुरवठा, जैविक इ. प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो. तर मजूर ,बाजारपेठ, भांडवल, वाहतूक सुविधा, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण,लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इ. मानवी घटकांचा परिणाम होतो. या घटकांना अनुसरूनच पीक पद्धतीमध्ये बदल दिसून येतो.

प्रश्न :

(१) कोणत्या खंडात शेतीचा विकास कमी झाला आहे ?

(२) शेती व्यवसायावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो?

(३) कोणत्या खंडात शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

(४) शेती व्यवसायावर कोणत्या मानवी घटकांचा परिणाम होतो ?


(ब) आकृती काढून नावे दया (कोणतेही दोन) :(४)

(१) रेषीय वस्ती

(२) भूगोल अभ्यासकाची कोणतेही पाच कौशल्य दाखवा.

(३) प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद.


प्र. ७. सविस्तर उत्तरे लिहा (कोणताही एक) :

(१) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक सोदाहरण स्पष्ट करा.

(२) भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.

No comments:

Post a Comment

First Unit Test 2021-22,Std-12

 

Translate