Type and Search from This Blog टाईप करून शोधा

द्वितीय सत्र परीक्षा - विषय- वाणिज्य संघटन व व्यवस्थापन

 इयत्ता ११ वी (वाणिज्य)

 द्वितीय सत्र परीक्षा - (२०१९-२०)

विषय- वाणिज्य संघटन व व्यवस्थापन


सूचना

१) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. (२) उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात.(३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.४) नवीन प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.

प्र.१ अ) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

१) सरकारी कंपनीचे भाग     .........च्या नावाने खरेदी केले जातात.

(क) रक्षामंत्री

अ) भारताचे राष्ट्रपती

ब) मुख्यमंत्री

२) भारतीय लघुउद्योग बँकेची स्थापना........ मध्ये झाली.

अ) १९८९

ब) १९९०

(क) १९९६

३) व्यवस्थापन.........असते

अ) गतिमान

ब) स्थिर

क) निवड करणारे 

 (४) व्यवसाय पर्यावरणाचा..........प्रचंड प्रभाव पडतो.

अ) सरकारवर

ब) जनतेवर

(क) व्यवसायावर

५) गोदामांमुळे वस्तूमध्ये..........उपयोगिता निर्माण होते.

(अ) ठिकाण

 ब )समय

क) रुप

ब) चूक की बरोबर ते लिहा.

१) नफ्यामुळे व्यवसायाची एकूण कार्यक्षमता वाढते.

२) मध्यम स्तर व्यवस्थापन धोरण आखण्याचे काम करते.

(३) सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांची मालकी सरकारची असते.

(४) व्यवसाय आणि पर्यावरण हे अविभाज्य घटक आहेत.

५) भारतीय लघुउद्योग विकास बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.

क) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) मॉल म्हणजे काय ?

२) व्यवस्थापन म्हणजे काय ?

३) जागतिक बँक म्हणजे काय ?

(४) अंतर्गत पर्यावरणात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो 

 ५) बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय ?

ड) पुढील विधानांसाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा.

1) इतरांकडून काम करून घेण्याची कला.

(२) अशी संस्था ज्यांची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा हा सरकारकडून केला जातो.

३) व्यावसायिक पर्यावरणातील व्यवसायाच्या नियंत्रणातील घटक.

(४) सेवाप्रेरित व्यवसाय संघटना,

५) व्यवसायाची जीवनदायिनी / रक्तवाहिनी,

प्र 2.खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. (कोणत्याही ४)

१) खादी ग्रामोद्योग आयोग 

२) एकछती दुकान

३) संयुक्त भांडवली संस्था

 (४) सरकारी कंपनी

(५) उच्च स्तरीय व्यवस्थापन

 (६) खाजगीकरण

प्र. ३ खालील घटना / परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. (कोणतेही २)

 १) अक्षया प्लॉटनम कंपनीची स्थापना १ जानेवारी, २०१८ रोजी झाली आहे.

खालील गोष्टीबाबत संचालक मंडळाला सल्ला मार्गदर्शन करा.

(अ) कंपनीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा केव्हा घेतली जावी ?

ब) कोणत्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा भरवावी ?

क) या सभेची नोटीस कंपनीने सभासदांना किती दिवस अगोदर पाठविली पाहिजे ?.

२) कंपनीने हक्क भाग वाटप करण्याचे ठरवले ----

अ) हक्कभाग वाटप करण्यासाठी कोणता दस्तऐवज भागधारकांना वितरित करावा लागेल ?

ब) याउलट सार्वजनिक भाग वाटप करताना कोणता दस्तऐवज वितरित करावा लागेल ?

क) कोणते दस्तऐवज अपूर्ण माहितीपत्रक आहे ?

३) श्री. अभिषेक हे चिटणिस आहेत. ज्यांना व्यवस्थापकीय संचालकांनी संचालक मंडळाच्या समेत घेतलेले निर्णय अनुपस्थित संचालकांना कळविण्यास सांगितले आहे. चांगल्या व्यवसाय पत्राच्या आवश्यकतेच्या कोणत्या पैलूंचे ते पालन करतील.

अ) जेव्हा ते आवश्यक माहिती अतिशय थोडक्यात आणि संक्षिप्त स्वरुपात देतात

 ब) जेव्हा ते सभ्य व विनम्र शब्द वापरतात.

क) जेव्हा ते सभेची संपूर्ण माहिती योग्य रितीने देतात.

प्र. ४ फरक स्पष्ट करा. (कोणतेही ३)

१) मुदत ठेव आणि आवर्ती ठेव

२) भागधारकांच्या सभा आणि संचालक मंडळाच्या सभा

3) प्रस्ताव व ठराव

4)घटनापत्रक आणि नियमावली 

प्र. ५ खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही २)

१) चिटणिसाच्या अंगी असणाऱ्या गुणांचे वर्णन करा,

(२) घटनापत्रकाची व्याख्या सांगून वैशिष्टे स्पष्ट करा.

३) चांगल्या व्यावसायिक पत्रातील आवश्यक बाबी नमूद करा.

प्र6). खालील विधाने सकारण स्पष्ट करा. (कोणताही २)

 १) दिवाळखोर व्यक्तीची कंपनीची सदस्यता संपुष्टात येते.

२) कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी मर्यादीत असते.

 (३) चिटणिस हा पगारी नोकर आहे.

(४) केंद्रसरकारने एन.सी.एल.टी.ला विशिष्ट अधिकार दिले आहेत.

प्र.7 )खालील प्रश्न सोडवा. (कोणतेही २)

१) वार्षिक सर्वसाधारण सभेस मुदत वाढ मिळावी म्हणून नोंदणी अधिकान्यास पत्र लिहा.

२) अधिदिकर्ष सवलत देण्यासंबंधी बँकेस पत्र लिहा,

३) कंपनीबरोबर होणाऱ्या करारामध्ये संचालकाने आपले हितसंबंध जाहीर करण्याबाबतची विनंती करणारे पत्र तयार करा.

प्र. ८ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही १)

१) कंपनीच्या सर्वसाधारण समाचे विविध प्रकार स्पष्ट करा ?

२) गुंतवणूकदाराच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र लिहा.

No comments:

Post a Comment

First Unit Test 2021-22,Std-12

 

Translate