Type and Search from This Blog टाईप करून शोधा

Direct into Indirect speech

 Direct into indirect speech

When We may report the words of a speaker in two ways

 1)Direct speech bike coating speakers actual words is called direct speech

 2)Indirect speech we may report we may report what the speaker said without putting his exact words are called as indirect or reported speech

 बोलणाऱ्याची संभाषण हे दोन प्रकारचे असते.

 Direct speech प्रत्यक्ष कथन 

 Indirect speech अप्रत्यक्ष कथन

1)Direct speech प्रत्यक्ष कथन 

 एखाद्या व्यक्तीचे बोलणे जसेच्या तसे सांगणे किंवा अवतरण चिन्ह यामध्ये कथित करणाऱ्यांनी याचा  Direct speech प्रत्यक्ष कथन  म्हणतात 

  Direct speech प्रत्यक्ष कथन  चे दोन भाग पुढीलप्रमाणे reported verb reported speech

Reported verb = अवतरण चिन्ह बाहेरील मुख्य वाक्याच्या क्रियापदाचा किंवा कोण कोणास म्हणाले या रचनेस Reported verb म्हणतात.

Eg. Raman said to the king, " The old man is not guilty".

 वरील वाक्यात Raman हा बोलणारा तर the king ही ऐकणारी व्यक्ती आहे तसेच said हे Reported verb आहे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सांगताना एखाद्या व्यक्तीबाबत, वस्तू बाबत, घटनेबाबत केलेल्या अवतरण चिन्ह आतील संभाषणास reported speechअसे म्हणतात

 वरील वाक्यात    " The old man is not guilty". हे reported speech आहे.

 Direct speech  प्रत्यक्ष कथनाची वैशिष्ट्ये

 *प्रत्यक्ष कथनात अवतरण चिन्हांचा वापर केला जातो

* अवतरण चिन्हात बोलणाऱ्याच्या प्रत्यक्ष शब्दांचा वापर केला जातो.

* प्रत्यक्ष कथनात Reported verb   नंतर स्वल्पविराम देतात.

2)Indirect speech अप्रत्यक्ष कथन

  When We may report what he said without coating speakers exact words which is called as indirect speech.

 जर एखाद्या व्यक्तीचे बोलणे तिसरी व्यक्ती सांगते किंवा मांडते या रचनेस   Indirect speech कथन म्हणतात किंवा बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे न सांगता आपल्या भाषेत बदल करून सांगणे यास अप्रत्यक्ष कथन म्हणतात.

 Direct speech  चे indirect speech  मध्ये होणारे बदल

 अप्रत्यक्ष कथनात indirect speech  मध्ये अवतरण चिन्हांचा वापर केला जात नाही.त्या अगोदरचे स्वल्पविराम नाहीसे होतात.

 Reported verb मध्ये says to  चे said to व tells चे told होते.

 Reported verb व reported speech जोडण्यासाठी वाक्याच्या प्रकारानुसार वेगवेगळे conjuction  जोड शब्द वापरले जातात.

conjuction (उभयान्वयी अव्यय /जोडशब्द)

 विधानार्थी (assertive statement) = that

प्रश्नार्थी (interrogative) = if,whether ,wh-question  आज्ञार्थी (imperative /command) = - to,  that,  not to

 उद्गारवाचक( exclamatory) = that

* अप्रत्यक्ष कथन करताना Reported verb मध्ये वाक्याच्या प्रकारानुसार बदल होतो.

-विधानार्थी assertive statement=( said toचे told )

- प्रश्नार्थी interrogative =( said toचे asked )

-आज्ञार्थी imperative /command= (said toचे ordered, commanded,suggested requested etc.)

 -उद्गार वाचक  exclamatory =(said to =exclaimed  )


अवतरण चिन्ह आतील वाक्यात पुरुषवाचक सर्वनामचा बदल केला जातो अवतरण चिन्ह यांतील वाक्यात आलेली सर्वनामे बोलणाऱ्या व्यक्तीच्या लिंग,वचन, पुरुष यानुसार बदलत असतात.

 I,you( singular=  he, she, it

we,you (plural = they

 He,she, it,they त्याच स्वरूपात राहते.

 # काळात होणारे बदल

 1) Reported verb वर्तमान काळात असल्यास speech च्या   काळात बदल होत नाही.

 She says to her, "I will read now ".

 She tells her that she will go then.

2)  reported verb  भविष्य काळात असल्यास speech च्या काळात बदल होत नाही.

Eg. Geeta will say, " They look after my children."

 Geeta will say that they look after her children.

3) reported verb भूतकाळात असल्यास speech मधील विधान त्रिकालबाधित सत्य (universal truth) असेल अथवा निसर्ग नियमानुसार घडत असेल किंवा एखादी म्हण असेल तर indirect speech च्या reported speech मधील काळात बदल होत नाही.

Eg. The teacher said, " The earth moves around the sun. "

The teacher said that the Earth moves around the sun.


 काळात होणारा बदल खालीलप्रमाणे 

 साधा वर्तमान काळाचे --साधा भूतकाळ होते

 साधा भूतकाळ --पूर्ण भूतकाळात होते

 पूर्ण भूतकाळ --पूर्ण भूतकाळ राहतो

 अपूर्ण वर्तमानकाळ- अपूर्ण भूतकाळ

 पूर्ण वर्तमान काळ -पूर्ण भूतकाळ

 चालू पूर्ण वर्तमान काळ काळाचे -चालू पूर्ण भूतकाळ 

 चालू पूर्ण भूतकाळाचे- चालू पूर्ण भूतकाळ




 अवतरण चिन्ह यांमध्ये येणारे वाक्य खालील प्रकारची असू शकतात विधानार्थी वाक्य

 प्रश्नार्थी वाक्य

आज्ञार्थी वाक्य

उद्गारवाचक वाक्य

 त्रिकालाबाधित सत्य



* विधानार्थी वाक्य

 ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने व त्यास एका विशिष्ट अर्थ दर्शक साह्यकारी क्रियापदांची जोड असते किंवा ज्या वाक्याच्या रचनेत कर्ता+  क्रियापद + कर्म असा विशिष्ट क्रम निश्चित असतो अशा वाक्यात 'विधानार्थी वाक्य' म्हणतात 

 Structure

 Subject +helping verb +main verb +adjective + object 

 He was eating a sweet dish.


 नियम

 Reported verb वर्तमान काळात असल्यास speech च्या काळात बदल होत नाही.

Reported verb भविष्यकाळात असल्यास speech च्या काळात बदल होत नाही.

  Reported verb  भूतकाळात असल्यास speech च्या काळात बदल होतो.

*Reported verb मध्ये say to चे tell, says to चे tells व said to चे told होते.

*told नंतर to लिहू नये.

* स्वल्पविराम व अवतरण चिन्ह काढून टाकावेत.

* स्वल्पविराम ऐवजी ताठा जोड शब्द वापरावा

* वाक्यातील कर्ता व कर्म ही बोलणाऱ्याच्या व ऐकणारा च्या लिंग वचन पुरुषांप्रमाणे बदलावी.

* सर्व नामाच्या जागी तृतीयपुरुषी सर्वनामे वापरावीत 

I-he, she

My- him, her , her




 Example

1)Anup said to Ashwin,"I am cleaning this beautiful room."

 Anup told Ashwin that he was cleaning that beautiful room.

2) Radha said to Geeta, " They have a new car".

 Radha told Geeta that they had a new car.

3) The doctor said, "I assure you that I too have full faith in God ".


 "4) "It was impossible to continue this way,"recalls Jessamine.

 Jessamine recalls  that it was impossible to continue that way.





2)  Interrogative sentence

a) verbal question -(yes- no type)

b) WH question 

A) verbal question =ज्या प्रश्नांची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदने होते किंवा ज्या प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त रूपात  yes किंवा no अशी असतात अशा प्रश्नांना verbal question म्हणतात.

 या प्रकारात पुढील सहाय्यकारी क्रियापदे येतात am , is, are was,were,can,could,may,might, must,shall, should,would,had,have,had,do,does,did 

 Structure = helping verb + subject + verb + adjective + object +?

* reported verb मध्ये says ऐवजी asks ,  say to  ऐवजी ask किंवा said to ऐवजी asked वापरतात.

*reported verb व reported speech जोडताना स्वल्पविराम व अवतरण चिन्ह काढून टाकून त्याऐवजी  इफ किंवा whether वापरावे

*अवतरण चिन्ह यातील प्रश्नार्थक वाक्य साधे करून वाक्याची सुरुवात कर्त्याने करावी.

* प्रश्नार्थक वाक्य याचे अप्रत्यक्ष कथन केल्यानंतर प्रश्नचिन्ह काढून टाकून पूर्णविराम द्यावा प्रश्नांचे विधानार्थी वाक्य करून क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरावे

*that व asked पुढे to वापरू नये


Eg. Maya said to the boys, "  Can you see the tree on the mountain. "

 = Maya asked the boys if they could  see the tree on the mountain.

2) He said to her, "  Can you do this".

 = He asked her if he could do that.

3) He said to her, " Will you go to  Pune today"

= He asked her if she would go to  Pune that day.


 WH question 

 ज्या प्रश्नांची सुरुवात  Wh सर्वनाममाने होती किंवा ज्या प्रश्नांची उत्तरे ही दीर्घ स्वरूपाची असतात अशा प्रश्नांना Wh प्रश्नार्थक वाक्य म्हणतात

 प्रश्नार्थक सर्वनामे what,  who ,when, where,how,whose whom,which  

 Structure=  interrogative pronoun + helping verb + subject + verb +  adjective + object +?

what are you doing exactly tomorrow?


Wh प्रश्नार्थी वाक्याचे अप्रत्यक्ष कथन करताना पाळावयाचे नियम

 *Reported verb मध्ये says to ऐवजी ask, says to ऐवजी asks व said to ऐवजी asked वापरावे.

* reported verb व reported speech जोडण्यासाठी स्वल्पविराम,अवतरण चिन्हांचा  न वापरता वाक्याची जोडणी करण्यासाठी स्वल्पविराम ऐवजी वाक्यातील प्रश्नार्थक सर्वनाम आणि सुरुवात करावी (wh words )

* reported verb च्या काळानुसार reported speech च्या काळात बदल करावा.

* कर्ता, कर्मानुसार अवतरण चिन्ह आतील सर्व नामात बदल करावा.

*प्रश्नार्थक वाक्य याचे अप्रत्यक्ष कथन केल्यानंतर प्रश्न चिन्हाचा वापर न वापरता शेवटी पूर्णविराम द्यावा.

* प्रश्नार्थक वाक्य याचा indirect speech करताना that वापरू नये व asked च्या पुढे to ची रचना करू नये.

eg. 1) she said to Asha where is my money

= She asked Asha where her money was.

2) she said to him, "what is your name.?"

= she asked him what his name was.


 3)Imperative sentence /command

 आज्ञार्थी वाक्य

 आज्ञार्थी वाक्याचे सुरुवात क्रियापदाचे होते ज्या वाक्याच्या प्रकारात अवतरण चिन्ह आतील वाक्याची सुरुवात  come, ask, stop, open अशा प्रकारच्या क्रियापदापासून होते वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो अशा प्रकारच्या वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

आज्ञार्थी वाक्याचे अप्रत्यक्ष कथन करताना चे नियम 

 Instead of said to we should use asked,  requested, adviced,ordered, commanded.

 Kedar said to Madhav, "  listen to my new song. "

 Kedar told Madhav to listen his new song.

2)" keep quiet", she said to her.

=she told her to keep quiet.

3) she said to the woman, " please give me something to eat. "

=He requested the women to give him something to eat.

 आज्ञार्थी वाक्याचे दोन प्रकार पडतात 1) affirmative-eg. Open the book.

and 2)   negative -eg. Don't open the book.

 1) she said to her, "Give me the book ".

she asked her to give her the book.

2) He said to his friend "Don't eat that Apple."

=He told his friend not to eat that Apple.


 वरील वाक्यात give च्या ऐवजी to give वापरले आहे.

 दुसर्या वाक्यात नकारात्मक वाक्यात dont ऐवजी not to वापरले आहे.

 Don't eat ऐवजी not to eat वापरले.


Let's ची  रचना

 Direct =He said to his friends, " let's visit to the temple. "

 indirect =He suggested to his friends that they should visit the temple.

 लेट ची रचना हि सूचना करण्यासाठी होत असते. अशा वाक्याचे  Indirect मध्ये करताना suggested वापरता.

 उद्गारवाचक वाक्य(Exclamatory ) ज्या वाक्याच्या प्रकारात वाक्याची सुरुवात what किंवा how ने होते किंवा oh, Alas, Hurrah, woo असे शब्दापासून होते व वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते अशा वाक्याला उद्गारवाचक वाक्य म्हणतात.

नियम

*said ऐवजी exclaimed

* अवतरण चिन्ह काढून टाकावे, to काढावे, that मी वाक्य जोडावे.

* उद्गारवाचक शब्द काढून टाकून त्याऐवजी very शब्दाचा वापर करावा

* वाक्याचे विधानार्थी वाक्य करून पुरुष व काळात योग्य बदल करावा

*उद्गारवाचक चिन्ह काढून टाकून शेवटी पूर्णविराम द्यावा.

 1)He said, " How happy she is.!"

 He exclaimed that she was very happy.

2) "Oh! I feel quite proud of it!" Radha exclaims.

= Radha explainst hat she feels quite proud of it.

3) Raj muttered, " What a stupid boy he is!

= Raj exclaimed that he was a very stupid boy.

💢💢💢💢💢💢💢

Click on the given link for modal auxiliary 👇👇👇👇👇

https://tusharkonlineclass.blogspot.com/search/label/Grammar%20-%20Modal%20verbs%2Fmodal%20auxiliary%20%2Fmodals

💢💢💢💢💢

💐💐💐💐

Click on the given link for Forms of Words (नाम, सर्वनाम, विशेषण, व क्रियापद )👇👇👇

https://tusharkonlineclass.blogspot.com/search/label/Forms%20of%20Words




💢💢💢💢💢💢

1 comment:

First Unit Test 2021-22,Std-12

 

Translate