Type and Search from This Blog टाईप करून शोधा

मानसशास्त्र अंतर्गत मूल्यमापन परीक्षा

 वेळ : १.०० तास           गुण २० गुण

(कोणतेही २०)

प्रश्न १ला) पुढील उदाहरणांवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा :

(१) संदेशने कोलाहल अधिक असल्यास विस्मरण अधिक असल्याचे शोधून काढले. म्हणजेच कोलाहल व  विस्मरण यांत कोणत्या प्रकारचा सहसंबंध असतो?

उत्तर :धन सहसंबध

(2) ताणाचे प्रमाण अधिक असल्यास कार्यक्षमता ढासळते हे मनोजला संशोधनाद्वारे दिसून आले. प्रमाण व कार्यक्षमता यांत कोणत्या प्रकारचा सहसंबंध दिसतो?

उत्तर : ऋण सहसंबंध

(3) रमेशने प्रकाशयोजनेचा अवधानावर होणारा परिणाम अभ्यासला, प्रकाशयोजना कोणत्या प्रकारचे ताणाचे परिवर्तक होय?

स्वतंत्र परिवर्तक

(४) अजयला मानसशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी विषय आवडतात. अजयला कोणत्या प्रकारची शास्त्रे आवडतात?

उत्तर : सामाजिक शास्त्र

(५) मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा ज्या देशात सुरू झाली, त्या देशास शैलेशला भेट देण्याची इच्छाआहे. शैलेशला कोणत्या देशास भेट दयावी लागेल?

उत्तर : जर्मनी

(६) जयेशला एकाच वेळी पंधरा मुलामुलींचे बुद्धिमापन करायचे आहे. चाचणी देण्याच्या पद्धतीनुसारजयेशला कोणत्या प्रकारची बुद्धिमापन चाचणी वापरावी लागेल?

उत्तर :सामूहिक बुद्धिमापन चाचणी

(७) अजय इतरांशी पटकन मैत्री करू शकतो. अजयला कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता अधिक आहे?

उत्तर : सामाजिक बुध्दिमत्ता

(८) मुक्ताला अडीच वर्षांच्या मुलीचे बुद्धिमापन करायचे आहे.कोणत्या प्रकारची बुद्धिमापन चाचणी वापरावी लागेल?

 उत्तर -अभाषिक कृतीचाचणी

(९) विजयला राग आला की तो आक्रमक होतो, अपशब्द वापरतो. विजयला कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता कमी आहे?

उत्तर : भावनिक 

(१०) संजय हा खूप बोलका आहे. तो सतत इतरांच्या संपर्कात राहतो. संजयच्या व्यक्तिमत्त्वातील ठळक गुण कोणता?

 उत्तर- बहिर्मुखी

 (११) स्वाती अत्यंत अबोल आहे. ती इतरांशी संपर्क साधणे टाळते. स्वातीच्या व्यक्तिमत्त्वातील ठळकगुण कोणता?

उत्तर :अतःर्मुखी

(१२) अशोकने मित्राने लिहिलेल्या कवितेला चाल लावली. हा विचारप्रक्रियेचा कोणता प्रकार आहे?

उत्तर :सर्जनशील विचार

(१३) फटाक्यांच्या आवाजामुळे नीलमची अभ्यासातील एकाग्रता खंडित झाली. अवधानाच्या कोणत्या अंगाविषयीचे हे वर्णन आहे?

   उत्तर- अवधान विकर्षण

(१४) भावनिक सुदृढता राखण्यासाठी अरविंद रोज पोहण्याचा सराव करतो. अरविंदने भावनिक सुदुद्धताराखण्यासाठी कोणत्या पातळीवरील उपाय अवलंबला आहे?

शारिरीक

(१५) सुनीलला लिफ्टमध्ये प्रवेश करताना विनाकारण भीती वाटत असे. ही भीती अनेक वर्षे वाटत असल्यामुळे त्याला मानसिक विकृती झाल्याचे निदान करण्यात आले. सुनीलला कोणती मानसिक विकृती झाली असावी?

उत्तर : भयगंड

(१६) अरविंद अतिप्रमाणात दारूचे सेवन करतो. दारू सोडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. अरविंदला कोणती मानसिक विकती झाली असावी ?

  उत्तर-अमली पदार्थ व्यसनासक्ती

 (१७) अत्यंत गंभीर दुखण्यातून अजय लवकर बरा झाला. अजयने कोणत्या प्रकारची लवचीकता दर्शवली?

उत्तर : शारीरिक लवचिकता 

(१८) अपघातात हात गेल्यावर सुजाता पायाने लिहायला शिकली. सुजाताच्या वर्तनातील सकारात्मक गोष्ट कोणती? उत्तर -शारीरिक लवचिकता

 (१9) महेश अभ्यास करताना इतका एकाग्रतेने करतो की तो आजूबाजूच्या गोष्टीमुळे थोडाही विचलित होत नाही. महेशच्या वर्तनामधील सकारात्मक गोष्ट कोणती?

 उत्तर : सजगता

(२०) उत्तरपत्रिका लिहिताना खूप चुका होत असल्याचे परिहारप्रक्रियेतील कोणत्या पायरीचे हे वर्णन आहे?

उत्तर : समस्या ओळखणे

 (२१) रोहनला परदेशातील निरक्षर व्यक्तींचे बुद्धिमापन करायचे आहे. चाचणी साहित्य प्रकारानुसार रोहनला कोणत्या प्रकारची बुद्धिमापन चाचणी वापरावी लागेल?

उत्तर: अभाषिक कृती चाचणी

(२२) तुम्हांला १०० कर्मचाऱ्यांची मुलाखत घेऊन त्यातील एका कर्मचाऱ्याची विशिष्ट कामासाठी निवड करायची आहे. त्यासाठी तुम्ही मुलाखतीचा कोणता प्रकार वापराल ?

उ त्तर :रचित मुलाखत

(२३) संदेश हा अत्यंत गरीब घरातील मुलगा स्व-कष्टाने आर्थिक परिस्थितीबदलता येईल असा विश्वास मनात बाळगतो. संदेशच्या वर्तनातील सकारात्मक गोष्ट कोणती?

उत्तर: आशावाद

(२४) मोडी भाषा शिकलेली नसल्यामुळे सतीशला ऐतिहासिक कागदपत्रांतील मजकुराचा अर्थबोध (संवेदन) झाला नाही, म्हणजेच संवेदनासाठी काय आवश्यक असते?

  उत्तर - पू र्वानुभव

(२५) संदीप त्याच्या मित्राचे अनुकरण करून पोहण्यास शिकला. अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीचे हे उदाहरण आहे?

उत्तर : निरीक्षणात्मक अध्ययन


No comments:

Post a Comment

First Unit Test 2021-22,Std-12

 

Translate